एक लग्नाची तिसरीत गोष्ट

भाग 0४

"Tring...... Tring....."
           सुमीत ने फोन उचलला,"हॅलो, कोण ?" " नमस्कार अप्पा आहेत का?" समोरचा इसम म्हणाला. सुमीतने फोन अप्पांना दिला. एव्हाना आप्पांना फोन कशा संदर्भात असावा याचा अंदाज आला होता. त्यांनी फोन घेतला आणि म्हणाले,"नमस्कार, काय निकाल लागला?" त्यावर समोरील इसम म्हणाला, "अप्पा, इतक्या दु:खातूनही तुम्ही कोण बोलतेय हे न विचारता, कोण जिंकले असा विचारलं. मी राजाराम पाटील निवडणूक जिंकलोय. गावचा सरपंच झालोय. इतकाच सांगायचं होतं. तुमच्या घरची परिस्थिती पाहता मी माझा टिळक होईल याची अपेकशा तर केली न्हवंतीच,पण तुम्ही नुसता फोन हातात धरून आपुलकीनं विचारपूस केलीत याबद्दल खरच धन्यवाद.काळजी घ्या अप्पा"
            अप्पा स्वतःला सावरत म्हणाले, " थांबा राजाराम भाऊ, आधी तुमच्या विजयासाठी तुमचं अभिनंदन. आणि राहिली गोष्ट टिळक करायची तर ते देशमुखांचे कर्तव्य आहे. आणि स्वतः चा कर्तव्यांपासून देशमुख पळत नाहीत. तुमचा टिळक बरोबर मुहूर्तावर होईल. फक्त एकदा पुन्ह: फोन करून कळवा." यावर राजाराम भाऊ म्हणाले,"अप्पा तुमची इच्छा असतानाही तुम्ही टिळक नाही करू शकणार. तू मान तुमचा घरातील बायकांचा. आणि सध्या तर.." "सध्या माझा घरात सूना नसल्या म्हणून काय झालं. या घरची लेक आहे. ती करेल टिळक तुमचा."असे म्हणत अप्पानी राजरंभाऊंना टिळक तयारी करण्यास सांगून फोन ठेऊन दिला.
             फोनवर घडलेला सगळा प्रकार घरातल्यानी ऐकला होता. सगळेच आप्पांच्या या निर्णयामुळे फार चकित झाले होते. दरम्यान लता मानातल्यामनात फार खुश झाली होती. करण अप्पांचा बोलण्यानुसार घरच्या लेकीला टिळक करण्याचा मान मिळणार होता. लता बाई खुश होऊन आपल्या तयारीला लागली. मनातल्या मनात कोणती साडी घालायची आता असा म्हणत ती स्वयंपाक घरात शिरली. अप्पा कोणाशी काहीही न बोलता आपल्या खोलीत गेले.इतक्यात कौस्तुभ पुढे आला आणि साविला म्हणाला,"सावी, आता फक्त ५ दिवस उरलेत. तू सगळं कसं करणार आहेस.? " यावर सावी म्हणाली, "अजून आई, काकांचा पत्ता नाही लागला. मला असा वाटतय तुमचं सगळ्यांच काम पूर्ण झालाय. तुम्ही सगळं सबमिट करा. मी माझं कारण सांगून बघते काही होता का. तुम्ही सगळे जा US ला परत." यावर आर्या म्हणाली," ठीक आहे सावी, आम्हीपण सांगूच सगळा घडलेला प्रकार. काळजी नको करुस. आम्ही उद्याच सकाळी उठून निघायच म्हणतोय. म्हणजे आपापल्या घरी जाऊन मग पुढे जात येईल." " बरं" असा म्हणू सावीने याला सहमती दिली. सुमीत म्हणाला, " बोलणे बरोबर नाही पण उद्याचा टिळक कार्यक्रम बघून निघा. तुम्हाला पाहता येईल अजून एक प्रथा या गावाची." यावर होकार देत सगळे आपापल्या खोलीत निघून गेले....

Comments