एक लग्नाची तिसरीच गोष्ट!!!


    भाग-०१


ही कथा आहे सावीची..

          सावी म्हणजेच सावित्री देशमुख आज US वरून भारतात येत आहे..कॉलेजचा काही प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करण्यासाठी ती आणि तिचे काही मित्र भारतात आलेत 15 दिवसांसाठी. सावीने विमानतळावर उतरल्या उतरल्या आईला फोन केला ,"हॅलो मम्मा, काशी आहेस? Guess what? I am in India."
 यावर सावीची आई म्हणजेच संगीता सुधीर देशमुख हिला काहीच सुधारेना. आनंदी व्हावं की रडावं अशी परिस्थिती ! संगीता बाई उत्तरल्या, "सावी तू 2 वर्षांनी भारतात परतलीयस, तू येतेयस हे तुला सांगावस नाही वाटलं का?" आईच्या या उत्तराने उद्विग्न झालेली सावी म्हणाली ," का ग ? तुला आनंद नाही झाला का मी आलीय त्याचा? आणि तसे पण मी गावी अप्पांकडे जाणार आहे, मला एक assignment आहे त्याचासाठी! मी, माझे मित्र कौस्तुभ, निरंजन आणि आर्या आलोय."
         "हुश्श, बरं झालं जाच तू साताऱ्याला अप्पांकडे. तसे पण आम्ही म्हणजे मी, तुझे बाबा, शुभंकर, काका सुनिल, सुजाता काकी, अभिज्ञ आणि शुभज्ञ शिर्डीला निघालोय साईबाबांचा दर्शनासाठी.पर्वा परस्पर सताऱ्यालाच येणार आहोत" निश्वास सोडत सावीच्या शंकेवर तिला दिलासा देत जड शब्दात संगीत उत्तरली.
         आता सावी चे बाबा म्हणजे सुधीर देशमुख, शुभंकर हा सावीचा लहान भाऊ,सुनील सुजाता हे सावीचे मोठे काका-काकी आणि त्यांची जुळी मुले ही अभिज्ञ आणि शुभज्ञ! आप्पा म्हणजे सावीचे आजोबा सुभानराव सर्जेराव देशमुख साताऱ्यातील एक लहानशा गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. राजकारणातील एक प्रसिद्ध नाव! तसे देशमुख कुटुंब गावातील एक प्रतिष्टीत कुटुंब . गावातल्या सरपंच-उपसरपंच यांचा टिळक करण्याचा मान या घराण्याचा. कधी काळी अप्पा गावचे सरपंच होते, त्यांचे वडीलही गावचे सरपंच होते पण अप्पांच्या मुलांनी काही ते पद मिळवण्याचा प्रयत्न नाही केला. आप्पाना याची सलती खंत नेहमीचीच!
  आप्पना 3 मुले सुनिल, सुधीर आणि सुमीत आणि एक मुलगी लता. सुनील आणि सुधीर नोकरी साठी पुण्यात आले आणि तिथेच स्थायिक झाले. मग संसाराचा गाडा आणि गाव पाठी राहिले. दोघांची मुले शिकायला US मधेच. आणि अप्पाचा लहान मुलगाही US ला शिकला आणि सिमरन नावाचा मुलीशी लग्न करून तिथेच स्थायिक झाला. एका ख्रिस्ती मुलीशी लग्न केल्याने सुमीत ला गावचे दरवाजे बंद होते.याला ही 2 लहान मुले आहेत. ज्यांना लाडाने सोनू आणि मनू नवाने बोलावलं जाते. सावी सुमीत काकाकडेच राहते US मध्ये.
          सावी आता मुंबईहुन विमानाने पुणे आणि तिथून आपल्या मित्रांसह थेट साताऱ्याला निघाली. आपल्या गावात एसटी मधून उतरली. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून लोक त्यांना निरखून पाहू लागले. सावी चक्क 10 वर्षांनी आपल्या गावी अली होती. गावाची ओढ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण गावातली शांतता तिला खूप प्रश्न भेडसावत होती. नजीकच एक इसमाला जाऊन तिने विचारलं, "आप्पा देशमुखांचे घर जरा दाखवता का? मी त्यांची नात ! " इसमाने त्यांना शांतपणे घरी नेऊन सोडले. सोडताना इसम म्हणाला," पोरी, आता अप्पाना तूच सांभाळ. हताश नको होऊस." साविला त्याचे बोलणे काही समजलेच नाही. ती पुढे गेली. दारातली गर्दी पाहून तिला भलतीच शंका ओढवली. अप्पाना काही झाले तर नाही ना? मनात विचार येऊ लागले. पुढे जाऊन पाहते तर काय? अप्पा ढसा ढसा रडत आहेत,लोळत आहेत. साविला काहीच समजेना.... अप्पा तर ठीक आहे मग कोणासाठी अप्पा रडत असावेत? इतक्यात सावीची लता आत्या धावत आली, साविला घट्ट मिठी मारली तिने आणि एकच वाक्य बोलली,"सावी, माझा दादा गेला. तुझे आई पप्पा गेले............"
 

Comments