एका लग्नाची तिसरीच गोष्ट

  भाग-०2

सावीला काही समजेना गोंधळून गेलेली ती आत्याला ,"अग, तू बारी आहेस ना काय बडबडतेयस?" असे विचारु लागली. धावत अप्पांकडे  गेली आणि म्हणाली,"अप्पा काय झालंय" "सगळं संपलं पोरी, सगळं संपलं" असे रडत रडत आप्पांनी उत्तर दिले. "अप्पा अहो, काय ते नीट सांगा " सावी म्हणाली. स्वतः ला सांभाळत सांभाळत अप्पा म्हणाले,"आज पहाटे पहाटे नाशिक पोलीसांचा फोन आला इथे,  सगळे शिर्डीला गेले होते, त्यांचा गाडीला रात्री 2 वाजता अपघात झाला आणि गाडी दरीत कोसळली. 7 जणांनपैकी चौघांचे शव सापडले आहेत.ते घेऊन एक ambulance थेट इथेच येत आहे. आणि बाकीच्यांचा तपास चालू आहे."
हे ऐकून सावीच्या पायाखालची जमीनच नाहीशी झाली,"अस काय बोलताय अप्पा मी कालच बोलीय आईशी. असा कस होईल?" थोडे अडखळत सावीने विचारले. तितक्यात अंबुलन्सचा सायरन ऐकू येऊ लागला. एकच रडारड सुरू झाली. जोरजोरात  हुंदके येऊ लागले. सावी ,अप्पा,लता आत्या कोणालाच आवरणे शक्य नव्हते. गाडीतून ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांची ओळख पटवण्यासाठी चेहरा दाखवण्यात आला. ते मृतदेह होते. सावीच्या वडिलांचे, शुभंकरचे, सावीची काकी सुजाताचे आणि शुभज्ञ की अभिज्ञ माहीत नाही. साविला स्वतः च्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्यात आई दिसत नव्हती. पोर पार ढासळून गेली . अप्पांची अवस्था खूप वाईट होती. ह्या वयात त्यांना आपला मुलगा, सून आणि नातवंडांना अग्नी द्यावा लागणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. सावीच्या मित्रांनी, गावातल्या लोकांनी, सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला.
     ओळख पटल्यावर ते मृतदेह तिथेच सोडून अंबुलन्स निघून गेली. लता आत्याच्या मुलाने क्षितिज ने ही बातमी US मधील सुमितला सांगितली. त्याचाही पार गोंधळ उडाला. मिळेल त्या विमानाने भारत गाठण्याची त्याची धडपड सुरू झाली. इथे मृतदेहांवर अंत्यसंस्काराला सुरुवात झाली.  2 वर्षानंतर भारतात येऊनही साविला फक्त आईचा  शेवटचा आवाजच ऐकायला मिळाला होता. कोना दुष्मनावरही वेळ येऊ नये अशी वेळ देशमुख कुटुंबावर अली होती. अखेर अंत्यसंस्कार झाले. सगळे निशब्द. आता आस होती ती फक्त उरलेल्या तिघांची चांगली बातमी ऐकण्याची..............

Comments