भाग-०३
दुसरा दिवस उजाडला...
सारं गाव शांत होता. चिटपाखरुचाही आवाज नव्हता.दुपार झाली. इतक्यात धापा टाकत टाकत सुमीत अप्पांचा लहान मुलगा वाड्यावर पोहचला. अप्पांना मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागला. अप्पांची नुसती फोनवरून काळजी करणारा सुमीत आज तब्बल 12 वर्षांनी अप्पांना भेटला होता. अप्पांनाही अनावर झाले," पोरा होत्याच नव्हतं झालं रे" असे म्हणत अप्पांनीही त्यांचा धीर गमावला.
लता आणि सावीला जवळ घेऊन धीर देण्याचा प्रयत्न करत सुमीतने विचारले," बाकिच्याचं काही समजलं का ?" " मामा , नाही. अजून तपास चालू आहे", असे क्षितिज म्हणाला.
क्षितिज हा लताचा एकुलता एक मुलगा. शिक्षण कमी असले तरी कमालीची बुद्धी आहे याला. नेमके डोके लावायचे कुठे हे याला बरोबर कळते. वडिल राजकारणात म्हणून हाही राजकारणात रत.लता साताऱ्यातील नाजीकचाच गावात दिली होती 3 भावनडांची एकुलती एक बहीण म्हणून लाडाने वाढली होती. सावीच्या वडिलांवर फार जीव तिचा. संगीता आणि लता ह्या बालपणीच्या खास मैत्रिणी. आपला मुलगा क्षितिज आणि सावी यांचं लग्न व्हावं ही तिची नेहमीची इच्छा. आता ते कसा होतं ते पुढे पाहूच.
तितक्यात सावीने सुमितला विचारलं," समु काकी नाही अली ?" समु म्हणजे सुमीत ची बायको. लग्नाधीची सिमरन आणि नंतरची समिधा. सुमीत लग्नाआधीपासूनच तिला समु म्हणून बोलवत असे आणि ती त्याला सॅम. यावर सॅम उत्तरला,"नाही, तिचे इथे येणं कदाचित सगळ्यांना आवडलं नसतं " हे ऐकताच एकदम शांतता पसरली. पुढे कोण काही बोलले नाही. त्यादरम्यान घडलेली सर्व घटना क्षितिज ने मामाला सांगितली. एकमेकांना धीर देत सगळे सावरले. पुढे या चौघांची कार्ये झाली. गावात निवडणूक होत्या. कार्यासाठी आलेली सगळी मंडळी इथेच राहिली होती. पण 10 दिवस उलटूनही उरलेल्या तिघांचा काही पत्ता लागत नव्हता.
आणि एक दिवस पुन्हा घरातला फोन वाजला. "Tring.........Tring..........."
Comments
Post a Comment