भाग0५
दुसरा दिवस उजाडला,अप्पांना टिळक करायचा मुहूर्त कळवण्यात आला. घरातली काम करणार्यांना बोलावून अप्पांनी सगळी तयारी करून घेतली. मस्त लाल रंगाची रेशमी नऊवारी साडी. टिळक करायचे ताट सगळं काही मस्त मांडलं होतं. लता बाईंचा थाठ आज काही वेगळाच होता. स्वारी अगदी आनंदात होती. इतक्यात दागिने आणि साडीच ताट उचलून अप्पा चालू लागले. लता च्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले," लता माझ्या सोबत चल जरा." लताला काही समजेना,तरी काही न बोलता आप्पांच्या पाठीमागून ती निघाली. अप्पा सावीच्या खोलीजवळ आले आणि थांबले. खोलीचा दरवाजा वाजवला. सावीने अप्पांना आत येण्यास सांगितले.
अप्पांनी हातातलं ताट साविला दिला आणी म्हणाले, "सावी, हे घे आणि टिळकाच्या तयारीला लाग, सरपंच येतच असतील.मला वाटतय की हा टिळक तूच कारावास.लता साविला तयार होण्यात मदत कर. आणि दोघी लवकर खाली या." काहीही न बोलता सावीनेही यांचावर सहमती दिली. लताच्या रागाचा पारा चांगलाच वाढला होता, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने साविला तयार करायला सुरुवात केली.
थोड्याच वेळात सरपंचांची मिरवणूक आली.अप्पानी साविला येण्यास सांगितले. नेहमी पाश्चात्य कपड्यांत वावरणारी सावि आज चक्क नऊवारीत पाहूण तिचे मित्रही थक्क झाले होते, गावकरी तर लांबची गोष्ट! सावीने कुंकवाचा टिळा राजाराम पटीलांना लावला व घरात येण्यास सांगितले. राजाराम भाऊ आत आले आणि म्हणाले, "पोरी, अप्पा, अपेक्षा नव्हती केली मी की या परिस्थितीत देखील तुम्ही माझा मान सन्मान कराल. धान्य झालो मी आज. दुसरा काही नाही बोलू शकत पण तुमच्या पाठची पीडा लवकरात लवकर टळो आणि उरलेल्यांची सुखरूपाची बातमी तुम्हाला कळों इतकीच परमेश्वराकडे विनंती." राजरंभाऊनी अप्पांचे चरण स्पर्श केले. तूर्तास सगळ्यांचे डोळे पुनः पाणावले.मिरवणूक निघून गेली.
दुसरीकडे सावीचे मित्र निघायच्या तयारीला लागले. कौस्तुभ सविजवळ आला आणि म्हणाला, " तुला यारूपात कधी कल्पनाच नव्हती केली. खूप छान दिसतेयस. सांभाळ स्वतःला आणि लवकर परत ये. वाट बघतोय" इतक्यात सावीच्या फोन वाजला. तिने फोन उचलला,"हॅलो, कोण??" समोरून आवाज आला,"हॅलो सावित्री मॅडम आहेत का?? मी इन्स्पेक्टर नाईक बोलतोय नाशिक हुन............!!"
Comments
Post a Comment